समता पर्वानिमित्त वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व पथनाट्य कार्यक्रम संपन्न
नांदेड (जिमाका) दि. 6 :- सामाजिक न्याय विभागातर्गंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड यांच्यावतीने 1 एप्रिल ते 1 मे 2023 या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समतापर्व अभियानातर्गंत विभागाच्या विविध योजनांच्या अनुषंगाने थेट जनतेपर्यत संवाद साधण्याच्या हेतूने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता पर्वानिमित्त 6 एप्रिल 2023 रोजी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त कार्यरत अनु. जाती मुलींची शासकीय निवासी शाळा हदगाव येथे पथनाट्य, निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक पी. आर. बुरकुले, तर कार्यालय अधीक्षक आर. व्ही .सुरकूटलावार यांच्या उपस्थितीत स्पर्धा पार पडल्या. यावेळी कनिष्ठ लिपिक सुदर्शन खराटे, अनु. जाती मुलींची शासकीय निवासी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील कार्यरत अनु. जाती. मुला-मुलींचे शासकीय निवासी शाळा व मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारावर आधारित वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा पथनाट्यात सुमारे 1 हजार 200 विद्यार्थी-विद्यार्थीनीनी सहभाग नोंदविला.
0000
No comments:
Post a Comment