Friday, September 16, 2016

अल्‍पसंख्‍याक विभागाच्या शाळा अनुदान योजनेत
प्रस्ताव सादर करण्‍यास 30 सप्टेंबर मुदत
नांदेड, दि. 16 "जिल्‍हयातील धार्मीक अल्‍पसंख्‍यांक विद्यार्थी बहुल शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था व अपंग शाळांमध्‍ये पायाभूत सुविधा पुरविण्‍यासाठी अनुदान योजनेसाठी इच्‍छुक शाळांकडून अर्ज शुक्रवार 30 सप्टेंबर 2016 पर्यंत जिल्‍हाधिकारी कार्यालयात स्विकारले जातील. प्रस्‍ताव सादर करण्‍यासाठी शासन निर्णय व अर्जाचा नमुना https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ देण्‍यात येणार नाही. याची संबंधितांनी नोंद घ्‍यावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष अल्‍पसंख्‍यांक विकास विभाग नांदेड यांनी केले आहे.
जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्‍त प्रस्‍तावांची छाननी, त्रुटींची पुर्तता करून अंतिमरित्‍या पात्र प्रस्‍ताव प्राप्‍त झाल्‍यापासून ते शनिवार 15 ऑक्टोंबर 2016 शासनास सादर करण्यात येणार आहे. सन 2016-17 या आर्थिक वर्षासाठी इच्‍छूक शाळांकडून अर्ज मागविण्‍याबाबत जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडे परिपूर्ण प्रस्‍ताव सादर करण्‍याची यापुर्वी 8 ऑगस्ट व जिल्‍हाधिकारी कार्यालयाने शासनाकडे पात्र प्रस्‍ताव सादर करावयाची 31 ऑगस्ट पर्यंत मुदत विहित करण्‍यात आली होती.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...