Friday, November 13, 2020

 

14 ते 21 नोव्हेंबर कालावधीत

महिला व बालविकास विभागातर्फे दत्तक सप्ताह 

नांदेड, (जिमाका) दि. 13 :-  जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षातर्फे 14 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत दत्तक सप्ताह राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात उन्नतीशिल महिला मंडळ संचलित लोहा तालुक्यातील सावित्रीबाई फुले शिशुगृह लोहा व नरसाबाई महिला मंडळ संचलित शिशुगृह गितानगर आनंदनगर नांदेड या दोन विशेष दत्तक संस्थांना शासकीय मान्यता प्राप्त आहे. या शिशुगृहात शुन्य ते 6 वर्षे वयोगटातील बालक असतात. तसेच परित्याग केलेले सोडून दिलेले किंवा सापडलेले बालकांना शिशुगृहात प्रवेश दिला जातो. त्यानंतर पुढील 60 दिवसात संबंधित पालकांनी संपर्क साधला नाही तर ते मुल दत्तक देण्यासाठी कायद्याने मान्यता प्राप्त होते. इच्छूक पालकांना अपेक्षेनुसार बालकाची दत्तक प्रक्रिया केंद्रीय दत्तक ग्रहण संसाधन प्राधिकरण (CARA) www.cara.nic.in या संकेतस्थळावर कायदानुसार ऑनलाईन नोंदणी करण्यात येते. 

नांदेड जिल्ह्यात परित्याग केलेले सोडून दिलेले किंवा सापडलेला अशा बालकांना जिल्हा महिला व बाल विकास कार्यालया अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष शास्त्रीनगर भाग्यनगर जवळ नांदेड येथे 02462-261242 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती आर. पी. काळम यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण

  76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण     नांदेड, दि. 25 जानेवारी :- ...