वृत्त क्र. 986
राज्यस्तरीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेचे शानदार उद्घाटन
नांदेड दिनांक २६ ऑक्टोंबर :- आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, व जिल्हा क्रीडा परिषद, नांदेड संयुक्त विद्यमाने व ऑल महाराष्ट्र वुश असोसिएशन व नांदेड जिल्हा वुशू असोसिएशन यांचे सहकार्याने राज्यस्तरीय शालेय वुशू (17 व 19 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धा सन 2024-25 चे आयोजन 25 ते 27 ऑक्टोंबर, 2024 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उदघाटन डॉ. हंसराज वैद्य (अध्यक्ष, नांदेड जिल्हा वुशू असो.) यांचे अध्यक्षतेखाली व सोपानजी कटके (सचिव, ऑल महाराष्ट्र वुशू असो.), यांचे हस्ते आज संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी श्रीमती अॅड. अर्चना जांभळे (विधी तज्ञ), जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे , एपीआय दिगंबर कांबळे, क्रीडा अधिकारी लातूर उपसंचालक कार्यालयचे डी.व्ही. गडपल्लेवार , राजेश जांभळे (सचिव, नांदेड जिल्हा वुशू असो.) श्रीमती प्रतिक्षा शिंदे (शिवछत्रपती पुरस्कारार्थी), सुरज सोनकांबळे (शिवछत्रपती पुरस्कारार्थी), डॉ. पचलिंगे (वैद्यकीय अधिकारी), अविनाश पाटील (जिल्हा सचिव कोल्हापूर), अमित म्हात्रे (जिल्हा सचिव, ठाणे), दिनेश माळी (जिल्हा सचिव, मुंबई) आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेकरीता महाराष्ट्र राज्यातील 08 विभागातून खेळाडू मुले-मुली, निवडसमिती सदस्य, पंच, सामनाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित झालेले आहेत. मुले खेळाडूंची निवास व्यवस्था गुरुग्रंथ साहिब भवन, यात्री निवास, गुरुद्वारा परिसर, नांदेड येथे तर सर्व खेळाडूंची भोजनाची व मुलींची निवास व्यवस्था जिल्हा क्रीडा संकुल क्रीडा वसतिगृहात करण्यात आली आहे.
या स्पर्धेकरीता पंच म्हणून अविनाश पाटील (कोल्हापूर), लक्ष्मण उदमले (अहिल्यानगर), महेश इंदापुरे (छ.संभाजीनगर), निलेश राऊत (वर्धा), श्रीमती प्रतिक्षा शिंदे (पुणे), विजय खंडार (अमरावती), प्रफल्ल करंजीकर (पुणे), श्रीमती तृप्ती चांदवडकर (पुणे), अभिषेक सोनवणे (वर्धा), गणेश कुटटे (परभणी), सुरज सोनकांबळे (शिवछत्रपती पुरस्कारार्थी, नांदेड), संदिप शेलार (शिवछत्रपती पुरस्कारार्थी, मुंबई), अमिर शेख (लातूर), कृष्णा सुरवसे (परभणी), प्रकाश ग्यानोबा वाघमारे (व्य. लिपीक), दिपक बिसेन (नागपूर), बंटी राठोड (छ. संभाजीनगर), गणेश साकुरे (भंडारा), सददा सय्यद (छ. संभाजीनगर), अनिल खराडे (बीड), राज वासवंड (पुणे), अतुल जाधव (जळगांव), प्रणव वाघमारे (नांदेड), अक्षय जांभळे (नांदेड), अजय नवघडे (नांदेड), माधव शेरीकर (सोलापूर), दिनेश सोनवणे (जळगांव), प्रणव विटणकर (वर्धा), रोहीत राऊत (पुणे), सुमित खरात (छ. संभाजीनगर), सौरभ पाटील (कोल्हापूर), पियुष ढोणे (मुंबई शहर), शोऐब शेख (मुंबई शहर), साहिल भंडारी (ठाणे), दिनेश माळी (मुंबई उपनगर), संकेत गायकवाड (पनवेल शहर) आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.
ही स्पर्धा यशस्वी करणेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांचे मार्गदर्शनाखाली राहुल श्रीरामवार (क्रीडा अधिकारी तथा कार्यासन), क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, चंद्रप्रकाश होनवडजकर (राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा कार्यासन), श्रीमती शिवकांता देशमुख, वरिष्ठ लिपीक संतोष कनकावार, कनिष्ठ लिपीक दत्तकुमार धुतडे, व्यवस्थापक संजय चव्हाण, आनंद जोंधळे, हनमंत नरवाडे, आकाश भोरे, मोहन पवार, सुभाष धोंगडे, शेख इकरम, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, सोनबा ओव्हाळ, यश कांबळे व आर्चरी असोसिएशनचे पदाधिकारी व खेळाडू आदिनी सहकार्य करीत आहेत.
ही स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल, नांदेड येथे आयोजीत करण्यात आले असून या स्पर्धेचा जास्तीत जास्त खेळाडू, क्रीडाप्रेमी, रसिक यांनी आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment