Friday, June 25, 2021

अनुसूचित जातीच्या मुलामुलींना परदेशात विशेष अध्ययनासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

                                  अनुसूचित जातीच्या मुलामुलींना परदेशात विशेष अध्ययनासाठी

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

           

नांदेड (जिमाका) दि. 25 :- अनुसूचित जातीच्या मुलामुलींना परदेशात विशेष अध्ययनासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृती योजना सन २०२१-२२ लागू आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अंतिम दिनांक ३० जून २०२१ रोजीच्या सायंकाळी 5.45 पर्यंत अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे,असे आवाहन पुणे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.  

परदेशात उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करणेसाठी परदेश शिष्यवृत्तीच्या निवडीसाठी १२ मे २०२१ च्या जाहिरातीद्वारे अर्ज मागविण्यात येत असल्याबाबतची जाहिरात व मुदतवाढ प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यानुसार अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक १४ जून २०२१ व त्यानंतर १८ जून २०२१ पर्यंत वाढविण्यात आला होता. आता अर्जकरण्याचा अंतिम दिनांक ३० जून २०२१ पर्यंत सायंकाळी ५.४५ राहील. उर्वरित जाहिरातीबाबतचा तपशील हा पूर्वी दिलेल्या जाहिराती प्रमाणेच असेलअसेही प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...