Friday, June 25, 2021

जिल्ह्यातील 95 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

                                          जिल्ह्यातील 95 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

नांदेड (जिमाका) दि. 25 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 95 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोविशील्डचा पहिला आणि दुसरा डोस तर कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. दिनांक 26 जून रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या 12 केंद्रावर लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालयडॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालयशासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, स्त्री रुग्णालयशहरी दवाखाना हैदरबाग,  शिवाजीनगरजंगमवाडीदशमेश हॉस्पिटलकौठाश्रावस्तीनगरसिडको व रेल्वे हॉस्पिटल या 12 केंद्रावर कोविशील्डचा 18 ते 44 वयोगट आणि 45 वर्षावरील व्यक्तींना पहिला व दुसरा डोस दिला जाईल. या केंद्रावर दोन्ही वयोगटासाठी प्रत्येकी 100 डोस उपलब्ध केले आहेत.

 

या व्यतिरिक्त कोव्हॅक्सीन ही लस श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालयडॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालयशासकिय आयुर्वेदिक महाविद्यालयस्त्री रुग्णालयशहरी दवाखाना हैदरबागशिवाजीनगरजंगमवाडीदशमेश हॉस्पिटलकौठाश्रावस्तीनगरसिडकोरेल्वे हॉस्पिटल या 12 केंद्रावर प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. याठिकाणी 18 ते 44 व 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसरा डोस दिला जाईल.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूरहदगावगोकुंदामुखेडग्रामीण रुग्णालय भोकरबिलोलीधर्माबादहिमायतनगरकंधारमांडवीलोहामाहूरमुदखेडबारडनायगावउमरी या 16 केंद्रावर कोविशील्डचे ही लस 18 ते 44 वयोगट व 45 वर्षावरील व्यक्तींना पहिला व दुसरा डोससाठी दिली जाईल. येथे केंद्रनिहाय प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. 

 

उपजिल्हा रुग्णालय देगलूरहदगावगोकुंदामुखेडग्रामीण रुग्णालय भोकरबिलोलीधर्माबादहिमायतनगरकंधारमांडवीलोहामाहूरमुदखेडबारडनायगावउमरी अशा एकुण 16 केंद्रावर कोव्हॅक्सिन ही लस उपलब्ध केली आहे. या प्रत्येक केंद्रांना प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहे. हे डोस 18 ते 44 व 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी दिले जातील.

 

जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणासाठी कोविशील्ड ही लस उपलध करुन देण्यात आली असून याठिकाणी 18 ते 44 व 45 वर्षावरील व्यक्तींना पहिला डोस व दुसऱ्या डोससाठी राहील. या सर्व 67 केंद्रांवर प्रत्येकी 100 याप्रमाणे दोन्ही वयोगटासाठी डोस उपलब्ध करुन दिले आहे.

 

जिल्ह्यात 24 जून पर्यंत एकुण 5 लाख 51 हजार 935 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 25 जून पर्यंत कोविड-19 लसीचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 4 लाख 89 हजार 930 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 44 हजार 960 डोस याप्रमाणे एकुण 6 लाख 34 हजार 890 डोस प्राप्त झाले आहेत.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. तसेच कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी 18 ते 44 व 45 वर्षावरील वयोगटासाठी फक्त दुसरा डोस घेण्याकरीता ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...