Saturday, January 26, 2019


पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते  
देगलूर-भक्तापूर ते नागराळ रस्त्याचे भूमिपजून
 
नांदेड, दि. 26:- बेटमोगरा उच्चा मनसक्करगा सुगाव सावरगाव इब्राहिमपूर खानापूर देगाव ते राज्यसिमा रस्त्याची सुधारणा करण्यात येणार आहे. देगलूर-भक्तापूर ते नागराळ रस्त्यांचे भूमिपजून पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते आज झाले. यावेळी आमदार सुभाष साबणे, आमदार राम पाटील रातोळीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार अशोक काकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शंकर तोटावार आदि संबंधित विभागाच्या विभाग प्रमखांची यावेळी उपस्थिती होती.
हा रस्ता प्रजिमा 73 दर्जाचा असून रस्त्याची एकूण लांबी सार्वजनिक बांधकाम विभाग, देगलूर अंतर्गत 26.20 कि. मी. एवढी आहे. यात डांबरीकरण करण्याचे एकूण लांबी 12.300  कि. मी. 3.75 मिटर रुंदी आहे. सुगावमधील 28.00 मिटर लांबीचे लहान पुलाचे बांधकाम करणे, एकूण 24 नळकाडी पुलाचे बांधकाम करणे , सुगाव, देगलूर, भक्तापूर अंतर्गत एकूण 700 मिटर सी.सी. नालीचे बांधकाम करणे, इब्राहीम, खानापूर अंतर्गत 500 मिटर लांबीचे सी.सी. रस्त्याचे बांधकाम करणे या बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे.  
0000

No comments:

Post a Comment

निवडणुकीच्या लगबगीत माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला.जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे नांदेड लोकसभापोटनिवडणुकीत निवडणूक ...