ग्राम सामाजिक
परिर्वतन अभियान तसेच नाविन्यपूर्ण अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यात 26 गावातील
विकास कामांच्या प्रगतीबाबत आढावा बैठक राज्याचे माजी मुख्य सचिव तथा ग्राम
सामाजिक परिवर्तन अभियानाचे व्यवस्थपकीय संचालक रत्नाकर गायकवाड, कार्यकारी संचालक
उमाकांत दांगट, मुख्य परिचालन अधिकारी तथा संचालक धनंजय माळी, व्यवस्थापक
दिलीपसिंग बयास यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज घेण्यात
आली. यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
अशोक काकडे यांच्यासह विविध विभागाचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातील
या अभियानांतर्गत समाविष्ट गावांत होत असलेल्या विविध योजनांचा कृतीसंगम, ग्रामकोश
निधी वापर तसेच विशेष प्रकल्प अंमलबजावणीतील प्रगतीचा आढावा घेऊन उपयुक्त सुचना
करण्यात आल्या.
ग्राम सामाजिक
परिर्वतन अभियान तसेच नाविन्यपूर्ण अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यातील किनवट
तालुक्यातील आंदबोरी (ई), आंबाडी तांडा,
गौरी, धामनधरी, दिगडी (मं), कनकवाडी, प्रधानसांगवी व वझरा बु. या आठ गावांच्या आणि
लोहा तालुक्यांतर्गत वाळकेवाडी, टेळकी, हंगरगा व फुटकळवाडी या पाच गावांचा, कंधार
तालुक्यातील हनमंतवाडी, रामनाईक तांडा, मोहिजा व हटक्याळ आणि हिमायतनगर
तालुक्यातील टाकराळा बु. पारवा बु. व टेंभी या तीन गावांचा याप्रमाणे नांदेड
जिल्ह्यातील 26 गावांचा समावेश करण्यात आला आहे.
00000
No comments:
Post a Comment