Monday, January 28, 2019


जी-2 झोन अंतर्गत कबड्डी विजेत्या संघाचे  
प्राचार्य डॉ. गर्जे यांच्याकडून अभिनंदन
नांदेड, दि. 28 :- शासकीय तंत्रनिकेतन हिंगोली येथे जी-2 झोन नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली या चार जिल्ह्यांतर्गत पार पडलेल्या कबड्डी स्पर्धेत नांदेडच्या शासकीय तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्याने सरस कामगिरीच्या जोरावर शासकीय तंत्रनिकेतन हिंगोलीच्या संघावर मात करुन विजेतेपद पटकावले.
तंत्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या क्रिडा गुणांना वाव मिळवून देण्यासाठी सालाबाद प्रमाणे याही वर्षी जी-2 झोन अंतर्गत यावेळी कबड्डी आयोजनाचे यजमानपद शासकीय तंत्रनिकेतन हिंगोली या संस्थेकडे होते. कबड्डी या क्रिडा प्रकारात शासकीय तंत्रनिकेतनासह 11 तंत्रनिकेतच्या संघानी सहभाग नोंदवला होता.
            या स्पर्धेसाठी संघ निवड प्रक्रियेची प्रशिक्षकाची महत्वपुर्ण जबाबदारी स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे अधिव्याख्याता एल. टी. जाधव यांनी पार पाडली. विजेत्या संघाचे कर्णधार संघातील खेळाडूंचे संघव्यवस्थापक के. डी. लोकरे यांचे अभिनंदन नांदेड शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. जी. व्ही गर्जे संस्थेचे उपप्राचार्य तथा स्थापत्य अभि. विभाग प्रमुख पी. डी. पोपळे, जिमखाना उपाध्यक्ष तथा विभाग प्रमुख उपयोजित यंत्रशास्त्र डी. एम. लोकमनवार, विभाग प्रमुख स्थापत्य (द्वितीय पाळी) एस. पी. कुलकर्णी , श्री. मुद्सिर, अधिव्याख्याता स्थापत्य विभाग एल. टी. जाधव अधि. स्थापत्य अभियांत्रिकी एम. एस. भोजने, जी. एम. नंदे, बी. पी. हूरदुके, आर. एस. पोहरे संस्थेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले आहे. 
000000

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...