वृत्त क्रमांक 471
भू-प्रमाण केंद्रात मिळणार एकत्रित विविध सेवांचा लाभ
आता ई-मोजणी अर्ज ऑनलाईन करता येणार
नांदेड दि. 6 मे :- उप अधीक्षक भूमि अभिलेख नांदेड या कार्यालयात भू-प्रमाण केंद्र 11 एप्रिल 2025 पासून सुरु करण्यात आले आहे. या भू-प्रमाण केंद्रात एका छताखाली नागरिकांना अनेक सेवांचा लाभ मिळणार असून, या विविध प्रकारच्या सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उप अधीक्षक भूमि अभिलेख बळवंत मस्के यांनी केले आहे. उप अधीक्षक भूमि अभिलेख नांदेड या कार्यालयात भू-प्रमाण केंद्राअंतर्गत नागरिकांना ई-मोजणी अर्ज ऑनलाईन करण्याची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. तसेच ईप्सीत अंतर्गत फेरफार अर्ज सुध्दा करण्यासाठी सुविधा आहे. तसेच सर्व प्रकारच्या नकला या केंद्रामार्फत उपलब्ध होणार आहेत. यामध्ये फेरफार नोंदवहीचा उतारा, परिशिष्ट-अ, परिशिष्ट-ब, नमुना 9 ची नोटीस, नमुना 12 ची नोटीस,अर्जाची पोच, रिजेक्शन पत्र, त्रुटी पत्र, निकाली पत्र, विवादग्रस्त नोंदवहीचा उतारा, डिजीटल मिळकत पत्रिका, सॉफ्ट कॉपी, अपील निर्णयाची प्रत, मुद्रण, छापील स्वरुपात अशा सर्व प्रकारच्या नकला ऑनलाईन पध्दतीने भू-प्रमाण केंद्रात उपलब्ध करुन मिळतील अशी माहिती उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
0000
No comments:
Post a Comment