वृत्त क्रमांक 472
नांदेड शहरात लोडशेडींगच्या अनुषंगाने
जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शनिवारी बैठक
विद्युत वितरण कंपनीसह संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे निर्देश
नांदेड दि. 6 मे :- नांदेड शहरातील अनेक भागात सध्या वारंवार लोडशेडींग होत आहे. या प्रकरणात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून लोडशेडींगमुळे विद्युत पुरवठा खंडीत होण्याच्या या घटनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शनिवार 10 मे 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या बैठक कक्षात सकाळी 11 वा. बैठक आयोजित केली आहे.
बैठकीस महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, विद्युत वितरण कंपनी नांदेड शहर, नांदेड ग्रामीण तसेच सर्व संबंधित अधिकारी, संबंधीत क्षेत्रीय अधिकारी यांनी अद्यावत माहितीसह उपस्थित राहावे, असे निर्देश अपर जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.
00000
No comments:
Post a Comment