“इंटरनेट ऑफ थींगस” विषयाचे
ऑनलाईन शिबिर संपन्न
नांदेड, (जिमाका) दि. 6 :- शासकीय
तंत्रनिकेतनच्या माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत “इंटरनेट
ऑफ थींगस” या विषयावर एफडीपीचे दोन दिवशीय ऑनलाईन शिबिर नुकतेच संपन्न झाले.
मुंबई तंत्रशिक्षण संचालनालयाने हा कार्यक्रम प्रमाणित केला होता.
राज्यातील
विविध तंत्रनिकेतनमधील अधिव्याख्यात्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. यावेळी
संस्थेचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. गर्जे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी
प्रमुख एस. एन. ढोले, अधिव्याख्याता के. व्ही. देवकर, मोसीन शेख, श्रीमती
एस.आर.शामराज यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहभाग घेतला.
या कार्यक्रमात श्री गुरुगोविंद सिंघजी
अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. एम. व्ही. वैद्य, पुणे येथील श्रीमती काशीबाई
नवले कॉलेजचे डॉ. पी. एन. महाले व शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. जी.व्ही. गर्जे
यांचा सहभाग होता.
00000
No comments:
Post a Comment