Monday, June 14, 2021

बांबु लागवड व रेशीम लागवड मार्गदर्शन कार्यशाळा

नांदेड (जिमाका) दि. 14 :- बांबु लागवड व रेशीम लागवड मार्गदर्शन कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे 15 जून रोजी सकाळी 10 वाजता कृषि, महसुल, वनविभाग व रेशीम विभाग यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे हस्ते होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा ठाकुर-घुगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 

या कार्यशाळेस माजी आमदार पाशा पटेल, जळगावचे बांबु अभ्यासक संदिप माळी, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे रेशीम संशोधक श्री लटपटे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. बांबू व रेशीम लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे, उप वनसंरक्षक एम. आर. शेख,  उपजिल्हाधिकारी रोहयो श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी केले आहे. तसेच याठिकाणी बांबुपासुन तयार केलेली फर्निचर व त्यापासुन तयार केलेली इतर साहित्य प्रदर्शनासाठी दुपारी 3 ते 5 यावेळेत डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे ठेवण्यात येणार असुन त्याची विक्रीपण करण्यात येणार आहे.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...