Wednesday, March 27, 2024

 वृत्त क्र. 278 

बांधकाम योग्य वाळू स्वस्त दराने उपलब्ध

 

·     वाळु डेपोवरुन वाळू वाहतुक सुरु

 

नांदेड दि. 27 :- जिल्‍हयात एकूण 24 वाळु डेपो प्रस्‍तावित करण्‍यात आले आहेत. यामध्‍ये बिलोलीदेगलुरमाहुरहदगाव व हिमायतनगर तालुक्‍यातील 17 वाळू डेपो हे नियमित वाळू डेपोंना पर्यावरण अनुमती प्रदान करण्‍यात आली आहे. उर्वरित 7 वाळू डेपो हे नांदेड व लोहा तालुक्‍यातील गाळमिश्रीत वाळु डेपो आहेत.


बिलोली तालुक्यात येसगी, सगरोळी-1 व नागणी, देगलूर तालुक्यात तमलूर व शेवाळा, हदगाव तालुक्यात बेलमंडळ,  नांदेड तालुक्यात वाघी, खुपसरवाडी, भायेगाव व लोहा तालुक्यात बेटसांगवी याठिकाणी मुबलक प्रमाणात वाळू साठा उपलब्ध आहे.

 

ग्राहकास वाळु डेपोत उपलब्ध होणाऱ्या वाळूच्या प्रमाणात ऑनलाईन प्रणालीवरुन वाळू विक्री सुरु करण्‍यात आली आहे. ज्‍या नागरिकांना वाळुची आवश्‍यकता आहे, अशा नागरिकांना नजिकच्‍या सेतू केंद्रावर जाऊन संपर्क करावा. सदरील सेतु केंद्रावर वाळु डेपोतुन वाळु मागणी करण्‍यासाठी ऑनलाईन प्रणालीवर दररोज कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नोंदणी करावयाची आहे. प्रत्‍येक वाळु डेपोवरुन प्रतिदिन किमान 200 ब्रास इतकी रेती बुकींगची मर्यादा निश्‍चीत केली आहे. प्रत्‍येक लाभार्थ्‍याना प्रति महिना 10 ब्रास इतकी वाळु उपलब्‍ध करुन देण्‍यात येईल. घरकुलाच्या लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू विनामूल्य उपलब्‍ध करुन देण्‍यात येईल. याप्रमाणे ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करुन नागरिकांनी वाळु उपलब्‍ध करुन घ्‍यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

#दर्पणदिन #पत्रकारदिन #नांदेड