Thursday, October 29, 2020

 

ऑनलाईन महारोजगार मेळावा

1 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत आयोजन 

 नांदेड (जिमाका) दि. 29 :- कौशल्य विकास रोजगार उद्योजकता, विभागीय आयुक्तालय, औरंगाबाद यांच्यामार्फत  1 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर 2020 या कालावधीत ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. एस.एस.सी., एच.एस.सी., आय.टी.आय., पदवीधर, डिप्लोमा अभियांत्रिकी पदवीधर, एम.बी.ए, इत्यादी पात्रता धारण केलेल्या उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केलेले आहे. 

सदर मेळाव्यात सहभागी होण्यासाठी या विभागाच्या  www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या वरील रिक्तपदांना आपल्या एम्पलॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजरआयडी पासवर्डने लॉग इन होऊन ऑनलाईन आप्लाय करावे. ज्यांची नोंदणी नाही त्यांनी नोंदणी करुन अप्लाय करावे. या मेळाव्यासाठी, जय बालाजी एन्टरप्रायजेस औरंगाबाद, अभिजय ऑटोपार्टस प्रा.लि. औरंगाबाद, आकार ऑटो इंडस्ट्रिज लि औरंगाबाद,चौगुले इंडस्ट्रिज प्रा.लि. पुणे, महावितरण कार्यालय औरंगाबाद, मुख्य जीवन विमा सल्लागार प्राधिकरण, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, सेक्युरिटी ण्ड इंटेलिजन्स सर्विसेस इंडीया लि. गोवा, रक्षा सेक्युरिटी फोर्स, हिंगोली, विराज प्रोफाईल लि. पालघर, श्री. गुरुकृपा इंजिनिअरिंग वर्क्स उस्मानाबाद, धूत ट्रान्समिशन औरंगाबाद, महिंद्रा स्टील सर्व्हीस लि. पुणे, एनआरबी बेअरिंग औरंगाबाद, सेंसीव्ह एज्युकेशन लि.पुणे श्री साई रिसर्च लॅब इ. नामांकिंत उद्योजकांनी 1902 ऑनलाईन  रिक्तपदे अधिसुचित केलेली  आहेत. 

याबाबत काही अडचण आल्यास या कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02462-251674 वर संपर्क करावा. तसेच जॉब व्हॅकेंसीज बाबत दररोज माहिती अपडेट करण्यात येते तरी उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या कालावधीत दररोज माहिती बघावी, असेही आवाहन कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केलेले आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...