वृत्त क्र. 612
दिव्यांगांसाठी मोफत कृत्रिम अवयव, सहायभूत साधन
मोजमाप- नाव नोंदणी शिबिराचे आयोजन
नांदेड, दि. 19 जुलै :- जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन व एलिम्को मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा प्रशासन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नांदेड यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी सी.एस.आर च्या माध्यमांतून मोफत कृत्रिम अवयव व साहाय्यभूत साधनांचे मोजमाप- नावनोंदणी शिबीराचे मंगळवार 23 व बुधवार 24 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता शहराच्या मगनपुरा भागातील आर.आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात आयोजन करण्यात आले आहे.
मोजमाप शिबिरासाठी दिव्यंगत्वाचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, यु.डी.आय.डी कार्ड, ऑडिओग्राफ (श्रवणयंत्रासाठी), दिव्यांगत्व दिसेल असे 2 फोटो असणे आवश्यक आहे. मोजमाप-नावनोंदणी शिबिरानंतर दिव्यांगाना कृत्रिम अवयव, सहायभूत साधनांचे वाटप अंदाजित एक महिन्याच्या कालावधीत वाटप शिबिरात करण्यात येणार आहे. या शिबिरात सी.एस.आर अंतर्गत मोटराइज्ड ट्रायसिकल, ट्रायसिकल, व्हीलचेअर, सी.पीचेअर, सुगम्यकेन, कुबडी जोड, मोबाईल, श्रावणयंत्र, रोलेटर, वॉकिंग स्टिक आदी साहाय्यभूत साधनांचा समावेश आहे.
शासकीय योजनेअंतर्गत गत तीन वर्षात सहायभूत साधनांचा व मोटराइज्ड ट्रायसिकलसाठी गत पाच वर्षात लाभ न घेतलेल्या लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव व सहायभूत साधनांचे वितरण होणार आहे. जिल्ह्यातील अशा अधिकाधिक दिव्यांग बांधवांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आउलवार तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समन्वयक नितिन निर्मल यांनी केले आहे. या शिबिराच्या अधिक माहितीसाठी आरआर मालपाणी मतिमंद विद्यालयात संपर्क (९०६७३७७५२० / ८२०८११४८३२) करावा असे आवाहनही करण्यात आले आहे.
0000
No comments:
Post a Comment