Friday, July 19, 2024

 वृत्त क्र. 607


प्रधानमंत्री पीक विमा योजनेत

सहभागी होण्यासाठी 31 जुलै पर्यंत मुदतवाढ

 

नांदेड दि. 19 जुलै : "प्रधानमंत्री पीक विमा योजना" खरीप हंगाम-२०२४ मध्ये शेतकऱ्यांना ऑनलाइन विमा अर्ज भरण्यास 31 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नांदेड जिल्हयातील  जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केली आहे.

 

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2025-26 मध्ये अधिसूचित क्षेत्रातील पिकांसाठी राज्यात राबविण्यास 26 जून 2023 च्या शासन निर्णयाद्वारे राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या योजनेंतर्गत खरीप हंगाम 2024 करिता ऑनलाइन स्वरूपात विमा अर्ज भरण्याची सुविधा 16 जून 2024 पासून सुरू केली असून सहभागाची अंतिम मुदत 15 जुलै 2024 अशी निश्चित करण्यात आली होती.

 

शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन योजनेत सहभागासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 'प्रधानमंत्री पीक विमा योजनाखरीप हंगाम ऑनलाईन विमा भरण्यास 31 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

०००००

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...