Wednesday, August 14, 2024

 वृत्त क्र. 717

जिल्हा युवा पुरस्काराचे आज जिल्हाधिकारी कार्यालयात मान्यवरांचे हस्ते वितरण 

 

नांदेड दि. 14 ऑगस्ट :- जिल्हयात कार्यरत असलेल्या युवक, युवतीं व नोंदणीकृत संस्थानी केलेल्या समाजहिताच्या उल्लेखीत कार्याचा गौरव व्हावा आणि युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी युवा पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले होते. सदर अर्जाची छाननी करुन अंतिम पुरस्कारार्थीची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या पुरस्कारार्थीना उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. तरी जिल्हयातील शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी, राज्य क्रीडा पुरस्कारार्थी, विविध एकविध खेळ संघटनेचे पदाधिकारी, खेळाडू मुले-मुली, प्रशिक्षक व क्रीडाप्रेमी यांनी उद्या 15 ऑगष्ट, 2024 रोजी सकाळी 8.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रांगणात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

 

राज्याचे युवा धोरण सन 2012 अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासननिर्णय 12 नोव्हेंबर,2013 अन्वये जिल्हयातील युवक, युवती तसेच नोंदणीकृत संस्थाकडून जिल्हा युवा पुरस्कार सन 2019-20, 2020-21, 2021-22 व 2022-23 या चार वर्षाच्या युवा पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त प्रस्तावाची जिल्हास्तर युवा निवड समितीच्या वतीने छाणणी करून अंतिम पुरस्कारार्थीची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

सन 2020-21 (युवक) करीता खान इम्रान मुजीब पाशा- बिलोली, सन 2021-22 (युवक) अमोल उध्दवराव सरोदे- रा.अर्धापूर जि.नांदेड, सन 2021-22 (संस्था) अध्यक्ष/सचिव अल इम्रान प्रतिष्ठाण, बिलोली जि.नांदेड, सन 2022-23 (युवक) अमरदिप दिगंबर गोधणे- हडको नवीन नांदेड .

या पुरस्काराचे स्वरुप युवकासाठी 10 हजार रुपये रोख, तसेच संस्थासाठी 50 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, गौरवपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असुन पुरस्कारार्थीना भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त 15 ऑगष्ट, 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात  मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमा मध्ये मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात येणार आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...