Wednesday, August 14, 2024

 वृत्त क्र. 718

स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त आज

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन 

नांदेड दि. 14 ऑगस्ट :- भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 77 वा वर्धापन दिन समारंभ गुरुवार 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी  9.05 वा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन समारंभ होणार आहे.  

 

सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी होण्यापुर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे,  सुरक्षिततेच्या दृष्टीने सोबत कोणतेही बँग किंवा तत्सम वस्तू आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.35 वाजेपूर्वी किंवा 9.35 वाजेनंतर आयोजित करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.  

 

00000 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...