Wednesday, August 14, 2024

वृत्त क्र. 720

मतदारांना विधानसभेसाठी 20 ऑगस्टपर्यत मतदार नोंदणी करता येईल

17 व 18 ऑगस्टला विशेष मतदार नोंदणी अभियान

 नांदेड, दि. १४ ऑगस्ट : मतदारांनो विधानसभा निवडणुकीमध्ये आपली मतदार नोंदणी करणे बाकी असेल तर शेवटची मुदत 20 ऑगस्ट असून या तारखेपर्यत नोंदणी करुन घ्यावी. तसेच आपण मतदार आहोत अथवा नाही याची खातरजमा करून घेण्यासाठी व नसेल तर आपले नाव यादीत घालण्यासाठी 17 व 18 ऑगस्ट रोजी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मतदान केंद्रावर जाऊन याबाबतची खात्री करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

येत्या शनिवारी व रविवारी म्हणजेच 17 व 18 ऑगस्ट रोजी विशेष मतदार नोंदणी अभियान संपूर्ण जिल्ह्यात राबविले जात आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन बीएलओकडे नाव वगळणे, कमी करणे, समाविष्ट करणे, तपासणी करणे ही प्रक्रिया करता येणार आहे.

जिल्ह्यामध्ये मतदार प्रारूप यादीचे दुसरे पुननिरीक्षण अभियान 6 ऑगस्ट पासून सुरू झाले आहे. येत्या शनिवार व रविवारी म्हणजेच दिनांक 17 व 18 ऑगस्ट रोजीही मतदान पुनरिक्षण राबविण्यात येणार आहे. 

000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...