Friday, October 12, 2018

गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस पोर्टलच्या
वापराबाबत सोमवारी कार्यशाळा
        नांदेड, दि. 12 :-जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था व जिल्हा उद्योग केंद्र, नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने  सोमवार 15 ऑक्टोंबर 2018 रोजी सकाळी 11 वा. GeM पोर्टलबाबत कार्यशाळा जिल्हा उद्योग केंद्र उद्योग भवन पहिला मजला कै. रामगोपाल गुप्ता सहकारी औद्योगिक वसाहत शिवाजीनगर नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेस कार्यालयाचे प्रतिनिधींनी उपस्थित रहावे, असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांनी केले आहे.
शासनाच्या सर्व विभाग / शासकीय उपक्रम / महामंडळे व त्याअंतर्गत सर्व कार्यालयाकडून वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी केंद्र शासनाने मानवी हस्तक्षेपाशिवाय व खरेदीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यासाठी गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) पोर्टल विकसित केलेले आहे. राज्य शासनाने पोर्टलची कार्यपध्दती वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी राज्यामध्ये दिनांक 8 डिसेंबर 2017 पासून बंधनकारक केले आहे. बहुतांशी कार्यालयाकडून GeM पोर्टलवरुन खरेदी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
भारत सरकारचे वाणिज्य सचिव यांनी सर्व राज्यातील मुख्य सचिव / अतिरिक्त मुख्य सचिव (उद्योग) यांच्याशी दिनांक 28 ऑगस्ट 2018 रोजी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सींग बैठकीत GeM पोर्टल राष्ट्रीय अभियान राबविण्याचे निर्देशित केले आहे.
त्यानुषंगाने जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था व जिल्हा उद्योग केंद्र, नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने  सोमवार 15 ऑक्टोंबर 2018 रोजी सकाळी 11 वा. GeM पोर्टलबाबत कार्यशाळा जिल्हा उद्योग केंद्र उद्योग भवन पहिला मजला कै. रामगोपाल गुप्ता सहकारी औद्योगिक वसाहत शिवाजीनगर नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळे जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नांदेड येथील पवार शिवराज पंढरी, वाघमारे आर.एन., नाईक अनुप प्रकाश हे व्याख्याते  मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेस कार्यालयाचे प्रतिनिधींनी उपस्थित रहावे, असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण

  76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण     नांदेड, दि. 25 जानेवारी :- ...