Tuesday, May 31, 2022

 विमा सल्लागार पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 31 :- नांदेड डाक विभागाकडून डाक जीवन विमा (पीएलआय) आणि ग्रामीण डाक जीवन विमा (आर पीएल आय) योजनेअंतर्गत डायरेक्ट एजंट (विमा सल्लागार) भरतीसाठी मुलाखती घेण्यात येत आहेत. सदरील अर्ज अधिक्षक डाकघर कार्यालय नांदेड विभाग नांदेड येथे उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात भरलेल्या अर्जासह मंगळवार 14 जून 2022 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 9:30 ते सायं 6 वाजेपर्यंत अधिक्षक डाकघर कार्यालय नांदेड विभाग नांदेड- 431601 येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. सोबत बायोडाटामूळ कागदपत्रेप्रमाणपत्र / अनुभव प्रमाणपत्र घेऊन येणे आवश्यक आहे, असे आवाहन नांदेड विभाग डाकघरचे अधिक्षक यांनी केले आहे.

  

 विमा सल्लागार पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्रता व मापदंड

उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी कमीत-कमी 18 वर्षं व जास्तीत-जास्त 50 वर्ष दरम्यान असावे.अर्जदार हा दहावी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. ज्यात केंद्रीय / राज्य मान्यता प्राप्त केलेली असावी. बेरोजगार/ स्वयंबेरोजगारमाजी विमा सल्लागारकोणत्याही विमा कंपनीचा माजी विमा एजंटमाजी सैनिकसेवानिवृत्त शिक्षकअंगणवाडी कार्यकर्तेमहिला मंडळ कार्यकर्तेग्रामप्रधानग्रामपंचायत सदस्य आदी टपाल जीवन विमासाठी थेट असे अर्ज करू शकतात. उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे व्यावसायिक कौशल्यव्यक्तिमत्वजीवन विमा बाबतचे ज्ञानसंगणकाचे ज्ञानस्थानिक भागाची माहिती आदी बाबी अपेक्षित आहेत. निवड झालेल्या उमेदवारास 5 हजार रुपये अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल. जी एनएससी / केव्हीपीच्या स्वरूपात असेल.

 

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात परवाना देण्यात येईल. जो आयआरडीएची परवाना परीक्षा पास केल्यानंतर कायम स्वरूपाच्या परवानामध्ये रुपांतरीत केली जाईल. ही परीक्षा 3 वर्षाच्या आत उत्तीर्ण करणे अनिवार्य राहील. नियुक्ती ही लायसन्स तत्वावर आणि कमिशन तत्वावर राहील, असेही प्रसिध्दी पत्रकाद्वारे नांदेड विभाग डाकघरचे अधीक्षक यांनी कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment

 लक्षवेध :नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदानाची अंदाजीत अंतिम आकडेवारी लक्षवेध : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील अंदाजीत अंतिम आकडेवारी वि...