Tuesday, September 26, 2017

शासकिय तंत्रनिकेतनमध्ये राज्यस्तरीय
टेक्नीकल पेपर प्रेंझेटेशन स्पर्धा संपन्न
नांदेड दि. 26 :- महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई पुरस्कृत राज्यस्तरीय टेक्नीकल पेपर प्रेंझेटेशन स्पर्धा इंजिनिअर्स डे चे औचीत्य साधुन शासकिय तंत्रनिकेतन नांदेड येथे नुकतीच संपन्न झाली.
या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य पी. डी. पोपळे यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणुन उपप्राचार्य डॉ. एस. ए. एच. कादरी, एम.जी.एम अभियांत्रिकी महाविदयालयाचे प्रा. डॉ. एम. जी. हरकरे,  ग्रामिण तंत्रनिकेतनचे प्राचार्य संजय देउळगांवकर, विश्व भारती तंत्रनिकेतन प्राचार्य शहाजी देशमुख यांनी काम पाहीले.
कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक विभाग प्रमुख यंत्रविभाग प्रा. आर. एम. सकळकळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले व या स्पर्धेसाठी यंत्र अभियांत्रिकी गटातुन एकुण 81 स्पर्धकांनी मिळुन 41 टेक्नीकल पेपर सादर केले अशी माहीती दिली.
इंजीनिअर्स डे निमित्त भारतरत्न सर मोक्ष गुंडम विश्वेश्वरया यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली त्यांच्या कार्याची आठवण प्रेरणादायी असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. सह समन्वयक प्रा. डॉ. संतोष चौधरी यांनी आभार मानले. प्रा. विजय उश्केवार यांनी सुत्रसंचालन केले व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या विद्यार्थी केंद्रीत उपक्रमाची विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासाशी सांगड घातली.
प्राचार्य श्री पोपळे यांनी विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या व विद्यार्थांनी या स्पर्धेमधुन स्व विकासाबरोबरच अभ्यासु वृत्ती जोपासावी असे आवाहन केले. डॉ. कादरी यांनी तांत्रिक विद्यार्थांना उपलब्ध असलेल्या संधीबाबत मार्गदर्शन केले. संदीप पॉलीटेक्नीक, नाशिकच्या संकेत कोठावदे हयाला 7 हजार 500 रुपयाचे प्रथम पारितोषीक, शासकिय तंत्रनिकेतन नांदेड येथील कु. श्वेता गबाळे व कु. शरयु वेसनेकर यांना 5 हजार रुपयाचे द्वितीय पारितोषीक, तसेच 2 हजार 500 रुपयाचे उत्तेजनार्थ पारितोषीक औरंगाबदच्या कु. आकांक्षा पुरकर हयांनी पटकावीले. संस्थेतील विविध विभाग प्रमुख व अधिव्याख्याता याप्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रम  यशस्वी करण्यासाठी प्रा. व्ही. यु. दातीर प्रा. एस. एम. कंधारे प्रा. एस.जी. बडेकर प्रा. डॉ. डक, प्रा. ए. एच. कदम, प्रा. के. एस. कळसकर, आर. एम. दुलेवाड, एम. एस. भोजने, मो. शकील, के. डी. लोकरे, जे.एच. ठोके, श्री गांधारे यांनी संयोजन केले. संस्थेच्या यंत्र अभियांत्रिकी व उत्पादन अभियांत्रिकीच्या विद्यार्थांनी कार्यक्रमाच्या आयोजनात उस्फुर्त योगदान दिले. डॉ. महेश शिवणकर, सहसंचालक तंत्र शिक्षण औरंगाबाद विभाग व डॉ. आनंद पवार, उपसचिव एम.एस.बी.टी.ई. औरंगाबाद विभाग यांचे संस्थेतर्फे आभार मानण्यात आले.
000000


No comments:

Post a Comment

76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण

  76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण     नांदेड, दि. 25 जानेवारी :- ...