Sunday, January 5, 2020


नारी शक्ती पुरस्कारासाठी
अर्ज करण्याचे आवाहन 
नांदेड दि. 5 :- नारी शक्ती पुरस्कारासाठी केंद्र शासनाने निर्गमीत केलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार महिला सक्षमीकरण, महिला कौशल्य विकास, पारंपारिक व अपारंपारिक क्षेत्रात महिलांसाठी कार्य तसेच ग्रामीण  भागातील महिला कल्याणासाठी केलेले कार्य, विज्ञान, तंत्रज्ञान, खेळ, कला, सांस्कृतिक, आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रात महिलांसाठी उल्लेखनीय कामकाज केलेल्या पात्र व्यक्ती, संस्था, स्वयंसेवी संस्था यांच्याकडून ऑनलाईन अर्ज, नामनिर्देशन मंगळवार 7 जानेवारी 2020 पर्यंत मागविण्यात आली आहेत.
नारी शक्ती वैयक्तिक पुरस्काराच्या बाबतीत वय 25 पेक्षा कमी नसलेल्या तसेच संस्थांच्याबाबतीत किमान 5 वर्षाचा अनुभव असलेल्या पात्र संस्थांना देण्यात येणाऱ्या नारी शक्ती पुरस्काराचे नामांकने सादर करण्यासाठी पात्र संस्था, व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, अर्जदारांनी अर्ज/नामनिर्देशन वेबसाईटवरील सुचनेनुसार योग्य त्या कागदपत्रांसह ऑनलाईन केंद्रशासनाचे www.narishaktipurarskar.wcd.gov.in www.wcd.nic.in या वेबसाईटवर भरावयाचे आहे. केवळ ऑनलाईन अर्ज स्विकारले जातील तसेच अर्ज / नामनिर्देशन भरण्याची अंतिम मुदत मंगळवार 7 जानेवारी 2020 आहे याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

 लक्षवेध :नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदानाची अंदाजीत अंतिम आकडेवारी लक्षवेध : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील अंदाजीत अंतिम आकडेवारी वि...