Sunday, January 5, 2020


बाभळी बंधारा पाणी प्रश्न
मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार
- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
नांदेड, दि. 5:-   बाभळी बंधारा पाणी प्रश्नी तेलगंणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याशी स्वत: राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना सोबत घेऊन चर्चा करुन प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. धर्माबाद येथील सत्कार समारंभ कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमास आमदार अमर राजूरकर, माजी आमदार वसंतराव चव्हाण, दत्ताहरी पाटील -चोळाखा, ताहेर पठाण, गोविंद पाटील रोषणगावकर, निलेश पाटील, राजू सुरकूटवार, नरेंद्र रेड्डी, श्रीराम जगदंबे, आकाश रेड्डी, राजू शिरामणे, भोजीराम गुणारकर, अभेदअली, सुधाकर जाधव, नागोराव पाटील रोषणगावकर, पदाधिकारी, पत्रकार, नागरिक आदिंची यावेळी उपस्थिती होती.
जिल्ह्यातील नागरिकांनी भरभरुन प्रेम दिले असून जिल्ह्यातील विविध विकासात्मक कामे पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. बाभळीचा प्रश्न मिटल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून जिल्ह्यासह उमरी, धर्माबाद तालुक्याच्यादृष्टीने महत्वाच्या विकासात्मक कामांना चालना देण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी सर्वांच्या सहकाऱ्याचीही अपेक्षा मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी व्यक्त करुन त्यांनी धर्माबाद येथील शंकरगंज येथील साईबाबा दर्शन मंदिरात दर्शन घेतले.
लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयास भेट
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी धर्माबाद येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयास भेट दिली. यावेळी लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या कार्यकारी मंडळांनी शालेय साहित्य भेट देवून मंत्री श्री. चव्हाण यांचा सत्कार केला.  
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष गंगाधर गुजराथी, सचिव डॉ. कमलकिशोर काकाणी, कोषाध्यक्ष महेंद्रकुमार पांडे, संचालक उमेशकुमार झंवर तसेच विश्वनाथ बन्नाळीकर,वर्णी गंगन्ना, प्राचार्य डॉ. दिगंबर मोरे ,शिक्षकवृंद, शिक्षिका आदिंची उपस्थिती होती.
भगवानराव पाटील भिलवंडे यांची भेट
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नरसी येथील भगवानराव पाटील भिलवंडे यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. यावेळी माजी आमदार वसंतराव चव्हाण, संभाजी भिलवंडे, रविंद्र भिलवंडे, राजू पाटील भिलवंडे आदि सदस्यांनी त्यांची भेट घेतली. 
विविध ठिकाणी मंत्री अशोक चव्हाण
यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी बरबडा, कहाळा (बु), कहाळा (खु). नायगाव तालुक्यातील कृष्णूर, पळसगाव, देगाव, नायगाव (बा), पिंपळगाव, नरसी. बिलोली तालुक्यातील लोहगाव, तळणी, पांचपीपळी, बिलोली धर्माबाद तालुक्यातील कुंडलवाडी या सर्वांचे ठिकाणी प्रत्येक गावातील ग्रामस्थ, नागरिक, पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.
0000

No comments:

Post a Comment

76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण

  76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण     नांदेड, दि. 25 जानेवारी :- ...