Wednesday, March 6, 2024

वृद्ध साहित्यिक व कलावंतानी बँक खाते आधार व मोबाईल क्रमांकाशी संलग्न केल्याबाबतची माहिती 15 मार्चपर्यंत कळवावी

 वृत्त क्र. 206

वृद्ध साहित्यिक व कलावंतानी बँक खाते आधार व मोबाईल क्रमांकाशी

संलग्न केल्याबाबतची माहिती 15 मार्चपर्यंत कळवावी

नांदेड दि. 5 :-  राजर्षी शाहू मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना सन 1954-55 पासून राज्यात सांस्कृतिक संचालनालयामार्फत राबविली जाते. शासनाने आता ही योजना डीबीटी मार्फत राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. डीबीटीमार्फत ही योजना राबविण्यासाठी सर्व वृद्ध कलावंताचे बँक खात्याशी मोबाईल व आधार क्रमांक संलग्न करणे आवश्यक आहे. तरी जिल्ह्यातील सर्व वृध्द कलावंतानी आपल्या आपले बँक खाते मोबाईल व आधार क्रमांकाशी संलग्न करुन त्याबाबतची माहिती 15 मार्च 2024 पर्यत तालुक्याच्या पंचायत समितीच्या समाज कल्याण विभागाकडे सादर करावीअसे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी केले आहे.  

सांस्कृतिक विभागाने जिल्ह्यातील तालुकानिहाय वृध्द कलावंताची गुगल शिट तयार केली आहे. याप्रमाणे जिल्ह्यातील वृध्द कलावंत एकूण संख्या 1 हजार 251 असून तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे. नांदेड-24अर्धापूर-52भोकर 79हदगाव-96हिमायतनगर -71किनवट-36माहूर -23मुदखेड-56 उमरी 33नायगाव-187मुखेड-93बिलोली-89कंधार-151लोहा-77धर्माबाद-177देगलूर-65 आहे. कलावंताचे बँक खात्याशी आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक संलग्न केलेली माहिती संबंधित तालुक्याच्या पंचायत समितीने प्राप्त करुन घ्यावी अशा सूचना सांस्कृतिक संचालनालयाने दिल्या आहेतसंबंधितानी यांची नोंद घ्यावी.

जे वृध्द साहित्यिक व कलावंत त्यांचे बँक खाते आधार कार्ड व मोबाईल क्रमांक संलग्न करुन त्याबाबतची माहिती दिलेल्या मुदतीत सादर करणार नाहीतत्यांच्या बँक खात्यावर मानधन जमा होणार नाहीअसे समाज कल्याण कार्यालयाने  प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...