Wednesday, July 12, 2017

होमगार्डची सदस्य नोंदणी
 17 व 18 जुलैला पोलीस मुख्यालया
नांदेड, दि. 12 :- जिल्ह्यातील नांदेड, कंधार, बिलोली, भोकर, किनवट, मुखेड, देगलूर व हदगाव या पथकासाठी पुरुष-91 व महिला-181 होमगार्डची सदस्य नोंदणी सोमवार 17 जुलै  2018 व मंगळवार 18 जुलै 2017 रोजी सकाळी 7 वा. पासून पोलीस मुख्यालयाचे कवायत मैदान वजिराबाद नांदेड येथे होणार आहे.  उमेदवाराची निवड ही पुर्णपणे गुणवत्तेवर होणार असून उमेदवारांनी कोणत्याही अमिषास किंवा भुलपाथांना बळी पडू नाही, असे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी केले आहे.
होमगार्ड नाव नोंदणीसाठी निकष पुढील प्रमाणे आहेत. इयत्ता 10 वी उत्तीर्ण, वय- 20 ते 50 वर्षे, उंची- पुरुष 162 व महिला- 150 सेमी. छाती- न फुगवता 76 सेमी, फुगवुन 81 सेमी. पुरुष उमेदवारांना विहित वेळेत 1 हजार 600 मीटर तर महिला उमेदवारांना विहित वेळेत 800 मीटर धावणे बंधनकारक आहे. पुरुषांना 7.260 किलो ग्रॅम वजनाचा गोळा फेक व महिलांना 4 किलो ग्रॅम वजनाचा गोळा फेक बंधनकारक आहे. पुरुष , महिला उमेदवारास चाचणीमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक प्रकारात कमीतकमी 40 टक्के गुण अवश्यक राहतील.
नोंदणी प्रक्रियेचा मुळ अनुशेष पुढील प्रमाणे राहील. पथकाचे नाव (कंसात पुरुष) कंसाबाहेर महिला संख्या. नांदेड (35) 56, बिलोली- (7)27, मुखेड (5) 11, देगलूर- (16) 7, हदगाव (28) 25, तर महिलांसाठी कंधार- 23, भोकर-11, किनवट- 21. उमेदवारांनी नोंदणीसाठी सोबत इयत्ता 10 वी उत्तीर्ण असल्याचे मुळ प्रमाणपत्र तसेच कोणताही रहिवाशी पुरावा व तीन रंगीत पासपोर्ट छायाचित्रे आणणे आवश्यक आहे. या व्यतीरिक्त उमेदवारांनी आयटीआय प्रमाणपत्र, खेळामध्ये कमीतकमी जिल्हास्तरावर सहभाग घेतलेले प्रमाणपत्र, माजी सैनिक, एनसीसी बी/सी प्रमाणपत्र, नागरी संरक्षण सेवेत असलेले प्रमाणपत्र, जडवाहन चालविण्याचा परवाना, तांत्रिक अर्हता गुण मिळविण्यासाठी सोबत आणावे. उमेदवारांनी मैदानी चाचणीच्या तयारीनिशी उपस्थित रहावे. काही अपरिहार्य कारणास्तव अडचण निर्माण झाल्यास नोंदणी कार्यक्रम रद्द करण्याचे अधिकार जिल्हा समादेशक यांना राहतील.
उमेदवारास नोंदणीसाठी स्वखर्चाने येणे-जाणे करावे लागेल. नोंदणीसाठी येताना शारिरीक चाचणीचे वेळी कोणताही अपघात घडल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी ही उमेदवाराची राहील. जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव सांगुन पैशाची मागणी केल्यास अधीक्षक लाचलूचपत प्रतिबंध कार्यालय नांदेड किंवा जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयाचा दुरध्वनी क्र. 02462-254261 तसेच प्रशासकीय अधिकारी आर. डी. डाबेराव - 7798358691, प्रभारी केंद्र नायक नानासाहेब मोखडे- 9049816641 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...