"स्वयम प्रकल्प" योजना किनवट ,
माहूर तालुक्यात राबविण्यात येणार
नांदेड, दि. 12
:- राज्य शासनाने आदिवासी भागात परसातील कुक्कुट पालनाद्वारे अंगणवाड्यांमधील
मुलांच्या आहारामधून अंडी पुरवठा करण्यासाठी व स्वयंरोजगार निर्मितीसाठी
"स्वयंम प्रकल्प" किनवट व माहूर या तालुक्यातील आदिवासी क्षेत्रामध्ये
राबविण्यात येणार आहे. "स्वयम प्रकल्प" संदर्भात अधिक माहितीसाठी पशुधन
विकास अधिकारी (वि) पंचायत समिती किनवट व माहूर यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन
जिल्हा पशुसंवर्धन उपाआयुक्त तथा सदस्य सचिव स्वयम प्रकल्प यांनी केले आहे.
या
योजनेचे अंमलबजावणी क्षेत्र प्रकल्प कार्यालय एकात्मीक आदिवासी विकास विभाग
यांच्याकडून निश्चित करुन एक मदर युनीट स्थापन करण्यात येणार आहे. मदर युनीटमार्फत
चार आठवड्याचे पक्षी निवडलेल्या
लाभार्थ्यांना तीन टप्प्यात प्रती लाभार्थी 45 पक्षी प्रमाणे वाटप करण्यात येतील.
योजनेची
जिल्हास्तरीय प्रकल्प समन्वयक समिती, मदर युनिटधारक व लाभार्थी निवड समिती शासनाने
पुढील प्रमाणे गठीत केली आहे. अध्यक्ष- जिल्हाधिकारी, सहअध्यक्ष- जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सदस्य- प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण
विकास यंत्रणा, सहायक संचालक समाज कल्याण (राज्यस्तर), जिल्हा महिला व बालकल्याण
अधिकारी (राज्यस्तर), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) जि. प., जिल्हा
पशुसंवर्धन अधिकारी जि. प., प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास प्रकल्प, जिल्हा
व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान (उमेद), प्रकल्प अधिकारी,
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सदस्य सचिव- जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त हे
राहतील. तर तालुकास्तरीय प्रकल्प संनियंत्रण समिती पुढील प्रमाणे. अध्यक्ष-
गटविकास अधिकारी, सदस्य- प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्प,
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान (उमेद) तालुकास्तरीय प्रतिनिधी, सदस्य
सचिव- पशुधन विकास अधिकारी (वि) पंचायत समिती हे राहतील.
000000
No comments:
Post a Comment