अकरावी व्यवसायिक प्रशिक्षण
अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु
नांदेड
दि. 12 :- येथील शासकीय तंत्र प्रशाला केंद्र संचलित इयत्ता 11 वी
व्यवसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रमांना (एचएससी व्होकेशनल) प्रवेश
सुरु असल्याचे मुख्याध्यापक शासकीय तंत्र प्रशाला केंद्र
नांदेड यांनी कळविले आहे.
या
प्रशाला केंद्रात चालवण्यात येणाऱ्या
व्यवसाय अभ्यासक्रमात ॲटोमोबाईल टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर
टेक्नॉलॉजी यांचा समावेश असून प्रत्येकी 25 प्रवेश क्षमता असणाऱ्या या
अभ्यासक्रमांना दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल.
ॲटोमोबाईल
टेक्नॉलॉजीसाठी शासकीय व निमशासकीय क्षेत्रात विविध संधी उपलब्ध असून स्वयंचलीत
दुचाकी, चारचाकी वाहनाचे दुरुस्ती केंद्र सुरु करता येते. ऑटो
फिटर, असेंब्ली शॉपमध्ये,
निरीक्षक, कारखान्यात विविध पदावर कामे करता येतात. ऑटो
डिलर, ऑटो स्पेअर पार्ट,
सेल्समन, व्हेईकल, सर्वेअर, ड्रायव्हर, शिल्प निदेशक इत्यादी. टायर पंक्चर दुरुस्ती, पार्ट
दुरुस्ती, सर्व्हिसींग सेंटर,
वेल्डींग, लेथ मशीन ऑपरेटर इत्यादी व्यवसाय करता येतात. एसटीमध्ये
अप्रेंटिशीप लागू.
इलेक्ट्रीकल
टेक्नॉलॉजी – शासकीय व निमशासकीय क्षेत्रात विविध संधी उपलब्ध. घरगुती
उपकरणाची दुरुस्तीची कामे करता येतात. मोटार रिवायंडिंगजी कामे करता
येतात. सेल्समन, विद्युत उपकरणाची डिलरशीप, एजन्सी इत्यादी ठेकेदारी प्रमाणपत्र देण्याची
व्यवस्था सुशिक्षीत बेरोजगार म्हणून 2 लाख 50 हजार
रुपयांपर्यंत विना निविदा कामे देण्याची व्यवस्था, स्वयंरोजगार कार्यालयात
व्होकेशनल टेक्निशीयन म्हणून नोंदणी. कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी – शासकीय व निमशासकीय क्षेत्रात विविध संधी उपलब्ध. संगणक
हाताळण्याचे सविस्तर प्रशिक्षण.
अभ्यासक्रमांच्या
प्रवेशासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य. मर्यादित जागा असल्यामुळे
दहावीचा निकाल लागताच आपला प्रवेश निश्चित करावा. प्रवेशीत विद्यार्थ्यांना पोस्ट
योजनेखाली कमवा व शिका या कार्यक्रमात सहभागी होता येते. विद्यार्थ्यांनी
ओजेटी या योजनेखाली औद्योगिक आस्थापनाकडे विशेष प्रशिक्षणासाठी दरवर्षी एक
महिन्यासाठी पाठविल्या जाते. लोकसेवा केंद्राच्या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना
संस्थेच्या मदतीने सहकारी संस्थेची नोंदणी करता येते. ज्यामध्ये
काम मिळाल्यावर सुरक्षा अनामत भरण्यापासून सूट मिळते. मागासवर्गीय
विद्यार्थ्यांना संबंधित व्यवसायाचे टुलकीटस् व पुस्तके मोफत देण्यात येतील. तांत्रिक
बेरोजगारांची सोसायटी स्थापन करुन शासनाकडून अनुदान मिळविता येते. सर्व
व्यवसायांना शिकाऊ उमेदवारी लागू असून त्याअंतर्गत एक ते दोन वर्षापासून 2 हजार 100 ते 2 हजार 400 प्रती
महिना मानधन, ईबीसी सवलत लागू.
तज्ज्ञ
शिक्षक वर्ग, परिपूर्ण यंत्रसामुग्री, कार्यशाळा, ग्रंथालय सुविधा, प्रशिक्षणाच्या कामात संगणकाचा
वापर करण्यात येतो.
व्यवसाय मार्गदर्शन केंद्रामार्फत रोजगार किंवा स्वयंरोजगार
मिळविण्यासाठी उपयुक्त सल्ला दिला जातो. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बीए, बीकॉम, बीसीए
प्रथम वर्ष तसेच पॉलिटेक्निकच्या द्वितीय वर्षास प्रवेशासाठी पात्र. इयत्ता
बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी. अधिक माहितीसाठी इच्छूकांनी
शासकीय तंत्र प्रशाला केंद्र आनंदनगर रोड बाबानगर नांदेड (दूरध्वनी
02462-259139) येथे संपर्क साधावा.
0000000
No comments:
Post a Comment