Friday, April 26, 2024

 वृत्त क्र. 391

रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत

 प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू


नांदेड दि. २६ : लोकसभा मतदाना दरम्यान आज रामतीर्थ येथे झालेल्या ईव्हीएम तोडफोडीनंतर या ठिकाणच्या व्हीव्हीपॅट व बॅलेट युनिटला बदलविण्यात आले. इव्हीएम फोडण्याच्या प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत झाले,अशी माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.

आज निवडणूक मतदान सुरू असताना देगलूर विधानसभा क्षेत्रातील बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथे एका मतदाराने ईव्हीएम मशीनची तोडफोड केल्याची घटना घडली. या घटनेमध्ये बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट थोडे क्षतीग्रस्त झाले. मात्र कंट्रोल युनिट वर कोणताही परिणाम झालेला नाही. घटनेनंतर निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तातडीने व्हीव्हीपॅट व बॅलेट युनिट बदलविण्यात आले.
 या घटनेनंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये पुन्हा मतदानाला सुरुवात झाली. कंट्रोल युनिट वर कोणताही परिणाम झाला नसल्यामुळे आधी झालेल्या मतदानाला कोणताही धोका नाही. तसेच संपूर्ण सेट अर्थात व्हीव्हीपॅट व बॅलेट युनिट बदलण्यात आल्यामुळे नव्या यंत्रांसह तातडीने मतदानाला सुरुवात झाली. ज्या मतदाराने ही तोडफोड केली त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...