वृत्त क्र. 977
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीपमार्फत विविध जनजागृती कार्यक्रम
मनपा आयुक्ताकडून जिल्हास्तरीय स्वीप कक्षाचा आढावा
नांदेड,25 - आगामी लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी 86- नांदेड उत्तर आणि 87- नांदेड दक्षिण मतदारसंघांमध्ये व्यापक जनजागृती मोहिम राबवण्यात येत आहे.
यानिमित्त आज नांदेड वाघाळा महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय स्वीप कक्षाचा आढावा घेण्यात आला.
यावेळी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनजागृती कार्यक्रमाची चर्चा करण्यात आली. मागील निवडणुकीत कमी मतदान झालेल्या केंद्रांवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या. बीएलओ (बुथ लेव्हल ऑफिसर्स) च्या माध्यमातून घरोघरी भेट देऊन मतदारांपर्यंत पोहोचणे, सार्वजनिक ठिकाणी पथनाट्य, मतदान शपथ, महिला बचत गटांचे मेळावे, विविध व्यापारी आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून मतदार जनजागृती करणे, तसेच ऑटोरिक्षातून जागृती संदेश प्रसारित करणे या उपक्रमांवर भर देण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांनी सांगितले.
महापालिकेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंट आणि ध्वनीक्षेपक रिक्षांचे उद्घाटन डोईफोडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मी मतदान करणार या स्वाक्षरी मोहिम फलकाचे अनावरण करण्यात आले. यात अनेकांनी सहभाग घेतला. उपस्थित अधिकारी आणि कर्मचार्यांनी विविध उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत सहमती दर्शवली. तसेच येत्या दिवाळीमध्येही स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
या बैठकीस महापालिका अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त अजितपालसिंघ संधू, शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी, जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी आडे, प्रा. डॉ. घनश्याम येळणे, अधीक्षक एस.आर. पोकळे, बालासाहेब कच्छवे, हनुमंत राठोड, सारिका आचमे, कविता जोशी, संजय भालके, सुनील मुत्तेपवार, साईराज मदिराज, आशा घुले, माणिक भोसले, शिवराज पवार, मुकुंद अनासपुरे, गणेश कस्तुरे, अनिल कांबळे यांच्यासह 86- नांदेड उत्तर मतदार संघ व 87- नांदेड दक्षिण मतदार संघाचे स्वीप कक्षाच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
00000
No comments:
Post a Comment