Wednesday, January 29, 2025

 वृत्त क्रमांक  121

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे दीक्षांत समारंभासाठी आगमन 

नांदेड दि. २९ जानेवारी: राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांचे आज एक दिवसाच्या दौऱ्यासाठी नांदेड येथे आगमन झाले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या २७ व्या दीक्षांत समारंभासाठी ते नांदेडला आले आहेत.

सकाळी साडेदहा वाजता त्यांचे नांदेडच्या गुरुगोविंद सिंघ जी नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी आमदार श्रीजया अशोक चव्हाण,नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेश डोईफोडे आदी उपस्थित होते.

00000






No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 36 8 मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा नांदेड दौरा  नांदेड, दि. 9 एप्रिल :-  राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे...