वृत्त क्रमांक 120
महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
नांदेड, दि. 28 जानेवारी : महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पुर्व परीक्षा-2024 ही रविवार 2 फेब्रुवारी 2025 रोजी नांदेड जिल्ह्यातील 48 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. ही परीक्षा सकाळी 11 ते दुपारी 12 या कालावधीत एका सत्रात होणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू राहील, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळवले आहे.
या परीक्षेचे कामकाज सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी
परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये रविवार 2 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले
अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही.
तसेच यावेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर परिसरात कोणत्याही व्यक्तीस कॅलक्युलेटर, ट्रान्झिस्टर,
रेडीओ, लॅपटॉप, तत्सम वस्तू
वापरण्यास व बाळगण्यास, तसेच सर्व सार्वजनिक टेलिफोन एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment