Tuesday, January 28, 2025

 वृत्त क्रमांक  117

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा दौरा 

नांदेड दि.२८ : राज्यपाल सी.पी राधाकृष्णन उद्या एक दिवसाच्या दौऱ्यासाठी नांदेड येथे येत आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या २७ व्या दीक्षांत समारंभासाठी ते नांदेडला उद्या येणार आहेत.

सकाळी साडेदहा वाजता त्यांचे नांदेडच्या गुरुगोविंद सिंघ जी नांदेड विमानतळावर आगमन होणार आहे. सकाळी 10:55 ला ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे पोहोचतील.

सकाळी 11 ते दुपारी बारापर्यंत दीक्षांत समारंभ सोहळ्यामध्ये ते सहभागी होतील. दुपारी दीडच्या सुमारास नांदेड येथून ते मुंबईकडे प्रयाण करतील.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक 245 बालकांची विशेष आरोग्य तपासणी मोहिम सुरु आज उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार राज...