Tuesday, January 28, 2025

वृत्त क्रमांक  118 

सोमवारी लोकशाही दिन  

नांदेड दि. 28 जानेवारी : नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन भवन येथे सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकशाही दिनाच्यामार्फत आपल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 12 पूर्वी आपल्या तक्रारी, निवेदने, जमा करावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.  

दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हा स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. यावेळेस 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजेपासून तक्रार करणाऱ्यांनी आपले निवेदन सादर करायचे आहे. त्यानंतर लगेचच तक्रार निवारणाचे काम सुरू होईल. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

00000

 


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 720   डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हिमालया बेबी फि डिंग सेंटर चा लोकाअर्पण सोहळा       नांदेड दि. 11 ...