Wednesday, January 29, 2025

  वृत्त क्रमांक 128

माजी सैनिकांची ऑनलाईन नोंदणी आता अनिवार्य

नांदेड दि. 29 :- महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्यामार्फत सर्व डाटा डिजिटलायझेशन, संगणकीकरण करण्याचे काम सुरु आहे. https://.mahasainik.maharashtra.gov.in या वेबसाईटवर 31 मार्च 2025 च्या पूर्वी रजिस्ट्रेशन करून अर्ज भरून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे जमा करावा. जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त सैनिकी अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व अवलंबितांना याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जर हे रजिस्ट्रेशन केले नाही तर महाराष्ट्र शासनाच्या ज्या सुविधा मिळतात त्या मिळणार नाहीत. यासाठी माजी सैनिकांना शुल्क म्हणून 100 रुपये लागणार आहे. माजी सैनिक विधवांना व अवलंबितांना शुल्क माफ आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे संपर्क करावा, असे आवाहन निवासी उप जिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी केले.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक 245 बालकांची विशेष आरोग्य तपासणी मोहिम सुरु आज उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार राज...