Tuesday, November 19, 2024

 वृत्त क्र. 1121

लोकसभेसाठी 19 लाख तर विधानसभेसाठी 27 लाखांच्यावर मतदार

6 विधानसभा क्षेत्रात एकदा बोटाला शाई दोनदा मतदान करता येणार

नांदेड , दि. 19 नोव्हेंबर :- नांदेड जिल्ह्यामध्ये 25 वर्षानंतर प्रथमच नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणूक एकत्रित होत आहे. त्यामुळे 9 विधानसभा मतदारसंघासाठी 27 लाखावर मतदार मतदान करणार आहेत. तर लोकसभेसाठी 6 मतदारसंघात 19 लाखांच्यावर मतदार मतदान करणार आहेत. 6 विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना एकदाच बोटाला शाई लावून दोन वेळा मतदान करता येणार आहे. या संधीचा लाभ घ्यावा व मोठया संख्येने मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

लोकसभेसाठी 9 लाख 78 हजार 234 पुरुष तर 9 लाख 30 हजार 158 महिला, तृतीयपंथी 154 असे एकूण 19 लाख 8 हजार 546 मतदार 2 हजार 82 केंद्रावर आपला मतदानाचा हक्क्‍ बजावतील. तर विधानसभेसाठी 14 लाख 30 हजार 365 पुरुष तर 13 लाख 57 हजार 410 महिला तर 172 तृतीयपंथी असे एकूण 27 लाख 87 हजार 947 मतदान नऊ विधानसभा मतदार संघासाठी मतदान करतील.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी ईव्हीएम मशिन्स

लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 2082 मतदान केंद्रावर मतदान होणार असून लोकसभेच्या 6 मतदार संघासाठी यात एकूण 4 हजार 997 बॅलेट युनिट तर 2 हजार 496 कंट्रोल युनिट तर 2 हजार 704 व्हीव्हीपॅट असणार आहेत. 9 विधानसभा मतदारसंघात एकूण 3 हजार 88 मतदार केंद्र स्थापन केले असून यात 83-किनवट मतदारसंघासाठी 811 बॅलेट युनिट, 414 कंट्रोल युनिट तर 447 व्हीव्हीपॅट देण्यात आले आहेत. हदगाव मतदारसंघासाठी 826 बँलेट तर 421 कंट्रोल, व्हीव्हीपॅट 455 वितरीत केले आहेत. ८५-भोकरसाठी बँलेट 843, कंट्रोल 429, व्हीव्हीपॅट 464 वितरीत करण्यात आले आहेत. 86-नांदेड उत्तर साठी बँलेट 1309, कंट्रोल 447, व्हीव्हीपॅट 483 ईव्हीएम वितरीत केले आहेत. 87-नांदेड दक्षिणसाठी बॅलेट 765,  कंट्रोल 390, व्हीव्हीपॅट 421 आणि 88-लोहा मतदारसंघात बँलेट 422, कंट्रोल 422, व्हीव्हीपॅट 456 ईव्हीएम वितरीत केले आहेत. 89 नायगाव साठी बँलेट 438, कंट्रोल 438, व्हीव्हीपॅट 473 तर 90 देगलूर साठी बँलेट 439, कंट्रोल 439, व्हीव्हीपॅट 474 मशिन्स दिले आहेत. 91 मुखेड मतदारसंघासाठी 457 बँलेट, कंट्रोल 457, व्हीव्हीपॅट 493 असे एकूण 6 हजार 310 बँलेट युनिट, 3 हजार 857 कंट्रोल युनिट व 4 हजार 166 व्हीव्हीपॅट युनिट दिले आहेत.

74 हजारावर नव मतदार बजावणार मतदानाचा हक्क

18 ते 19 या वयोगटातील 44 हजार 290 पुरुष तर 30 हजार 396 महिला मतदार तर 6 तृतीयपंथी आपला मतदानाचा हक्क पहिल्यांदा बजावतील. तर 20 ते 29 या वयोगटातील 6 लाख 32 हजार  964 मतदार तर 30 ते 39 या वयोगटातील  6 लाख 61 हजार 786 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. तसेच 40 ते 49 या वयोगटातील 6 लाख 18 हजार 119 मतदार असून 50 ते 59 वयोगटातील 3 लाख 82 हजार 32 मतदार मतदान करतील.  60 ते 69 या वयोगटातील 23 लाख 175 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. तर 70 ते 79 या वयोगटात एकूण 11 लाख 9 हजार 141 मतदार असून 80 ते 89 या वयोगटातील एकूण 55 हजार 687 मतदार मतदान करतील. 90 ते 99 या वयोगटात 12 हजार 42 तर 100 ते 109 या वयोगटात 1 हजार 304 मतदार मतदानाचा हक्क बजावतील.  110 ते 119 या वयोगटातील 2 तर 120 वयाच्या वरचे 3 जेष्ठ मतदार  आहेत.

टक्केवारीसाठी व्होटर टर्नआऊट ॲपचा वापर करा

मतदानाच्या संदर्भात आकडेवारी व किती मतदान झाले याबाबत सर्व सामान्यामध्ये उत्सुकता असते त्यासर्वानी व्होटरटर्नआऊट ॲप डाऊनलोड करावे यावर माहिती ठराविक वेळेनंतर अपलोड होणार आहे. यावेळी निवडणूक आयोगाने पोलींग पाटर्याचे संगणकीकृत प्रणालीद्वारे ट्रॅकिंग केले जाणार आहे. चक्रीका असे या प्रणालीचे नाव आहे. याशिवाय या निवडणुकीत जिल्ह्याच्या व प्रत्येक निवडणूक केंद्राच्या मुख्यालयात कंट्रोल रूम स्थापन केले आहे.

याशिवाय आपले मतदान केंद्र शोधण्यासाठी जिल्हाप्रशासनाने लिंक जारी केली असून https://deonanded.in/ps.php या लिंकवर आपले मतदान केंद्र शोधता येणार आहे.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1210 लोकसभा उमेदवारांची आज खर्चाच्या पुनर्मेमेळाची बैठक नांदेड दि. 18 डिसेंबर :- लोकसभा निवडणुकीमध्ये सहभागी झालेल्या उमेदवार...