वृत्त क्र. 1122
प्रत्येक मतदारसंघात महिला, दिव्यांग व तरुणांचे बुथ मतदाराच्या स्वागतासाठी सज्ज
नांदेड, दि. 19 नोव्हेंबर : लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. मतदाराना मतदान करण्याठी प्रोत्साहन मिळावे, तसेच जिल्ह्यात जास्तीत जास्त मतदान व्हावे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने नवनवीन संकल्पना राबविण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून नांदेड जिल्ह्यात काही मतदान केंद्रावर महिलांनी चालविलेले (पिंक सेंटर), दिव्यांगानी चालविलेले केंद्र (पीडब्ल्यूडी), तरुणांनी चाविलेले मतदान केंद्र (यंग केंद्र )उभारले आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रीयेत भाग घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
नांदेड जिल्ह्यातील किनवट मतदारसंघात जिल्हा परिषद केंद्रीय प्रा. शाळा, माहूर, हदगाव मतदार संघात विवेकानंद हायस्कुल, भोकर मतदारसंघात जिल्हा परिषद मुलींची शाळा, बारड, नांदेड उत्तरमध्ये ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल, वाडी बु. , नांदेड दक्षिणमध्ये गुजराथी हायस्कुल, वजीराबाद, लोहा मतदारसंघात जिल्हा परिषद हायस्कूल 141, नायगाव मतदारसंघात कृषी उत्पन्न बाजार समिती नायगाव, देगलूर मध्ये जि. प. शाळा भटगल्ली, मुखेड मतदारसंघात गुरुदेव विद्यामंदीर याठिकाणी पिंक केंद्र अर्थात पूर्णत: महिलांनी चालविलेले केंद्र उभारण्यात आले आहे.
तर किनवट मतदारसंघात सिध्दार्थ नगर प्राध्यापक कॉलनी गोकुंदा येथे, हदगाव मधील जि.प. हायस्कुल पार्ट नं. 85, भोकर पंचायत समितीमध्ये पंचायत समिती कार्यालय, उत्तर नांदेडमध्ये पोतदार इंटरनॅशनल स्कूल वाडी बु, दक्षिण नांदेड मध्ये गुजराथी हायस्कुल वजीराबाद पार्ट नं. 63, लोहा मतदारसंघात जि.प. हायस्कुल 136 , नायगाव मतदारसंघात नायगाव जि.प. शाळा, नरसी, देगलूर मतदारसंघात जि.प. हायस्कुल लोहगाव, मुखेड मतदारसंघात जि.प. हायस्कुल सावरगाव येथे पीडब्लु केंद्र अर्थात दिव्यांगानी चालविले केंद्र उभारले गेले आहे.
याशिवाय किनवट मतदारसंघात अंगणवाडी केंद्र वाघदरी, हदगावमध्ये जि.प. शाळा कौठा, भोकर मध्ये मौलाना अब्दूल कलाम आझाद हायस्कुल, मुदखेड, 86-नांदेड उत्तर मध्ये नांदेड फार्मसी शामनगर, नांदेड दक्षिण मध्ये गुजराथी हायस्कूल वजीराबाद, लोहामध्ये जि.प. हायस्कूल लोहा, नायगाव मध्ये जि.प. शाळा कृष्णूर, नायगाव मध्ये जि.प. शाळा अल्लापुर, देगलूरमध्ये जि. प. शाळा जाबं बु. याठिकाणी यंग बुथ निर्माण केले आहे. याठिकाणी सर्व कर्मचारी 40 वर्षाखालील आहेत. याशिवाय 539 पर्दानसिन केंद्र आहेत. 5 संवेदनशिल केंद्र आहेत. तर जिल्ह्यामध्ये यावर्षी 1 हजार 679 सैनिकासाठी पोस्टल मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 3088 मतदान केंद्रापैकी 2517 मतदान केंद्र सर्वसामान्य आहेत. तर अन्य केंद्र वैशिष्यपूर्ण आहेत.
00000
No comments:
Post a Comment