Tuesday, November 19, 2024

  वृत्त क्र. 1124

निवडणूक निरीक्षकांची राहणार मतदारसंघात उपस्थिती

अनेक मतदार केंद्राना आज भेटी देणार 

नांदेड दि. 19 ऑक्टोबर : भारत निवडणूक आयोगाने 16-नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा मतदारसंघासाठी सामान्य, खर्च, पोलीस निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. हे सर्व निरीक्षक उद्या मतदानाच्या दिवशी 20 नोव्हेंबर रोजी लोकसभा व विधानसभा क्षेत्रात विविध ठिकाणी भेटी देणार आहेत. मतदान केंद्रावरील सोयी-सुविधा व नागरिकांच्या मतदान प्रक्रियेचे निरीक्षणनही ते करणार आहेत. मतदारांनी आपापल्या विधानसभा क्षेत्राच्या संदर्भातील काही माहिती किंवा तक्रारी असेल तर त्यांच्या जाहिर करण्यात आलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

सामान्य निवडणूक निरीक्षक शेलेंद्रकुमार (भाप्रसे) यांची 83-किनवट व 84- हदगाव या विधानसभा क्षेत्रासाठी आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 7499127265 आहे. तर 85-भोकर व 86-नांदेड उत्तर मतदारसंघासाठी बी. बाला माया देवी (भाप्रसे) यांचा संपर्क क्रमांक 8483990380 आहे तर 87-नांदेड दक्षिण- व 88-लोहा मतदार क्षेत्रासाठी श्रीमती पल्लवी आकृती (भाप्रसे) यांचा 8237960955 संपर्क क्रमांक आहे. तर 89-नायगाव, 90-देगलूर व 91-मुखेड मतदारसंघासाठी रण विजय यादव (भाप्रसे) यांचा 7385842084 संपर्क क्रमांक आहे.   

विधानसभा व लोकसभा  निवडणुकीसाठी भारतीय पोलीस सेवेचे वरिष्ठ अधिकारी कालु राम रावत हे नांदेड येथे कार्यरत आहेत. त्यांचा निवडणूक काळातील स्थानिक संपर्क क्रमांक 8180830699 आहे. आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी मयंक पांडे (आयआरएस)  नांदेड जिल्ह्यातील किनवट, हदगाव, भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण या विधानसभा क्षेत्राचे खर्च निरीक्षक म्हणून जबाबदारी आहे. यांचा संपर्क क्र. 8483845220 आहे.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   70 कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह • 20 ते 26 जानेवारी कालावधीत सप्ताह   नांदेड दि. 18 जानेवारी : मुख्यमंत्री देवेंद...