Tuesday, November 19, 2024

 वृत्त क्र. 1125

सीआयएसएफच्या मार्फत जिल्ह्यामध्ये कडक तपासणी सुरु

एफएसटी आणि एसएसटी पथकावरही निगराणी ठेवणार

नांदेड दि. 19 नोव्हेंबर: निर्भय व पारदर्शी वातावरणात लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणूक पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मदतीला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची तुकडी जिल्ह्यात तैनात करण्यात आली आहे. त्यामुळे मोठया प्रमाणात नाकाबंदी सुरु असून कडेकोट तपासणी केली जात आहे. जिल्ह्यामध्ये फिरते तपासणी पथक (एफएसटी) व स्थिर तपासणी पथक (एसएसटी) पथकाची तपासणी मोहिम सुरु आहे. 

जिल्ह्यात सध्या एफएसटी पथक 27 तर एसएसटी 32 अशी एकूण 59 पथके कार्यरत आहेत. या उपलब्ध यंत्रणेवरती सीआयएसएफचे नियंत्रण असणार आहे. गेल्या काही दिवसात जिल्ह्यामध्ये मोठया प्रमाणात तपासणी केली जात असून नागरिकांनी याला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 20 नोव्हेंबरच्या मतदानाला लक्षात घेवून रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ झाली असून नागरिकांनी 50 हजारापेक्षा जास्त रोख रक्कम विनापरवानगी बाळगू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1210 लोकसभा उमेदवारांची आज खर्चाच्या पुनर्मेमेळाची बैठक नांदेड दि. 18 डिसेंबर :- लोकसभा निवडणुकीमध्ये सहभागी झालेल्या उमेदवार...