"दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस"
21 मे ऐवजी 20 मे रोजी साजरा करावा
नांदेड, दि. 17 :- "दहशतवाद व हिंसाचार
विरोधी दिवस" रविवार 21 मे 2017 रोजी साजरा करण्यात येतो. रविवार 21 मे 2017
रोजी राज्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांना सुट्टी असल्याने "दहशतवाद व
हिंसाचार विरोधी दिवस" हा शनिवार 20 मे 2017 रोजी दहशतवाद व हिंसाचार विरोधी
प्रतिज्ञा घेऊन साजरा करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकान्वये
दिल्या आहेत.
जिल्ह्यातील सर्व विभाग
प्रमुखांनी दि. 16 मे 2017 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये योग्य ती कार्यवाही करावी
व शनिवार 20 मे 2017 रोजी "दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस" साजरा करावा,
असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
000000
No comments:
Post a Comment