दिव्यांग शिष्यवृत्तीचे प्रस्ताव
दाखल करण्यास 9 फेब्रुवारीची मुदत
नांदेड, दि. 3 :- प्राथमिक, माध्यमिक
शाळेतील तसेच महाविद्यालयातील शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांचे
शालांतपूर्व व महाविद्यालयीन मॅट्रीकोत्तर दिव्यांग शिष्यवृत्ती प्रस्ताव
विद्यालय, महाविद्यालयांनी जिल्हा समाज कल्याण विभाग जि. प. यांचेकडे शुक्रवार 9
फेब्रुवारी पर्यंत दाखल करावीत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी नांदेड
यांनी केले आहे.
मुख्याध्यापक,
प्राचार्यांनी परिपुर्ण प्रस्ताव ऑफलाईन आवश्यक कागदपत्रासह जसे विहित नमुन्यातील
अर्ज, आधार कार्ड, बँक पासबुक, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे दिव्यांगत्वाचे
वैद्यकीय प्रमाणपत्राच्या सत्यप्रती सोबत दाखल करावेत. विलंब झालेल्या प्रस्तावाचा
विचार केला जाणार नाही याची जबाबदारी मुख्याध्यापक, प्राचार्यांची राहील, असे
आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment