जीईएम
पोर्टल वापराबाबत
उद्योग
भवन येथे बुधवारी कार्यशाळा
नांदेड, दि. 14 :- शासनाच्या
गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेस या वेब पोर्टलची माहिती सर्व शासकीय / निमशासकीय
कार्यालय, उत्पादक व पुरवठादारांना व्हावी व त्यानुसार त्यांनी त्याचा वापर करावा,
यादृष्टिने एक दिवसीय कार्यशाळा बुधवार 16 मे 2018 रोजी उद्योग भवन सभागृह नांदेड
येथे आयोजित केली आहे.
या
कार्यशाळेत पुणे येथील हेमंत सुद्रीक, GeM's Consultant हे
मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा उद्योग भवन सभागृह पहिला मजला शिवाजीनगर
नांदेड येथे उत्पादक व पुरवठादारांसाठी सकाळी 11 वा. तर शासकीय निमशासकीय कार्यालय
(खरेदीदार) यांचेसाठी दुपारी 2 वा. आयोजित केली आहे. संबंधितांनी कार्यशाळेस
उपस्थित रहावे, असे आवाहन अधिक्षकीय उद्योग अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
केंद्र
शासनाने शासकीय खरेदीदार विभांगाकडून वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी Government
e-Market Place (GeM) हे पोर्टल विकसीत केले आहे. राज्याच्या उद्योग
उर्जा व कामगार विभागाने दि. 24 ऑगस्ट 2017 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे GeM
या वेब पोर्टलद्वारे खरेदीची कार्यपद्धती स्विकृत करुन लागू केली
आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000
No comments:
Post a Comment