Thursday, March 9, 2023

 कर्तव्य पथावरील नारीशक्ती चित्ररथाचे

माहूर येथे भव्य स्वागत
नांदेड (जिमाका) दि. 9 :- महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठे; नारीशक्ती या चित्ररथाचे आज माहूरगडावर भव्य स्वागत करण्यात आले. शासकीय विश्रामगृहाशेजारील प्रांगणात महाराष्ट्राच्या लौकिकाला साजेशा असलेल्या या चित्ररथाचे माहूरचे नगराध्यक्ष फेरोज दोसानी, तहसीलदार किशोर यादव, रेणुकादेवी संस्थाचे विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्नव, अरविंद देव, अशिष जोशी, चंद्रकांत रिठे, राठोड, स्वाती आडे, प्रिती जगत, बंजारा महासंघाचे पांडुरंग राठोड, महिला संघाच्या पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे कर्तव्यपथावर संचलन सोहळ्यात गौरवान्वित झालेल्या महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठे नारिशक्ती या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. चित्ररथाचा देखावा महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांना भेट देणाऱ्या भाविकांना, सर्वसामान्यांना पाहता येण्यासाठी हे प्रदर्शन माहूर येथे दोन दिवस राहणार आहे. सर्व नागरीकांनी व भाविकांनी या चित्ररथाच्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
00000
(छायाचित्र : बालाजी कोंडे )








No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...