Monday, October 3, 2022

 प्रगतिशील तांत्रिक शेतीसाठी

सुशिक्षित तरुणांचे योगदान मोलाचे

      -    डॉ. देविकांत देशमुख

नांदेड (जिमाका) दि. 3 :- कासारखेडा गावातील तरुण शेतकऱ्यांनी बीबीएफ व टोकण पद्धतीने व नवीन तंत्रज्ञान वापरून केलेल्या सोयाबीन लागवडीची पध्दत अत्यंत उत्कृष्ट असून यापुढेही सुशिक्षित तरुणांनी शेतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन कमी पाणी व जमिनीचा वापर करून स्मार्ट शेती करावी, असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र पोखर्णीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख यांनी केले.

राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन उत्पादकता वाढ मूल्य साखळी विकास योजनेअंतर्गत मौजे कासारखेडा येथे शेतीशाळा शेती दिन शेतकरी प्रशिक्षण’ कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यशाळेस तालुका कृषी अधिकारी सिध्देश्वर मोकळे यांनी खरीप हंगामामध्ये प्रकल्पांतर्गत राबविलेल्या बाबींचा ऊहापोह करुन प्रकल्प चांगल्या प्रकारे राबविल्याचे सांगितले.  गावकऱ्यांनी प्रकल्प राबविताना केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील उत्पादित सोयाबीन पुढील हंगामासाठी आतापासूनच नियोजित बियाणे बीजोत्पादन म्हणून साठवावे. भेसळ होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यामुळे बियाणे खरेदीचा खर्च कमी होईल, असेही यावेळी सांगितले.

लिंबगावचे मंडळ कृषी अधिकारी प्रकाश पाटील यांनी ऊस बेणे निवडलागवड पद्धतीसोयाबीन व इतर शेतमालाचे मूल्यवर्धनासाठी शेतकऱ्यांनी आपली प्रक्रियायुक्त मूल्य साखळी तयार करावी, असे सांगितले. सूत्रसंचालन कासारखेडाचे कृषि सहायक वसंत जारीकोटे यांनी तर आभार प्रदर्शन दशरथ आढाव यांनी मानले. या शेती दिन कार्यक्रमासाठी मंडळ कृषि अधिकारी सतीश सावंतकृषि सहायक रमेश धुतराजसरपंच प्रतिनिधी तानाजी शिंदेचंद्रशेखर शिंदेअश्विन शिंदे,  व्यंकटराव शिंदेसाहेबराव शिंदेग्राम पंचायत सदस्य योगाजी देशमुखभिमा हिंगोलेरावसाहेब कडेकरशिवदास कडेकरसुरेश हिंगोलेराजाराम शिंदेकिशोर शिंदेशहाजी शिंदे आदीसह शेतकऱ्यांची उपस्थिती लाभली.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...