Wednesday, September 21, 2016

दुर्गादेवी मंडळांना वर्गणीसाठी
ऑनलाईन नोंदणीचे आवाहन
  नांदेड, दि. 21 :- दुर्गादेवी मंडळासाठी वर्गणी गोळा करण्याचा परवाना 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर 2016 या कालावधीत धर्मादाय उपआयुक्त कार्यालय नांदेड यांच्यामार्फत कार्यालयीन वेळेत देण्यात येत आहे. ही परवानगी ऑनलाईन पद्धतीने असून ऑनलाईन नोंदणी www.charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर करुन परवानासाठी आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करणे आवश्यक आहे. दुर्गादेवी मंडळांनी ऑनलाईन परवानगी घेवूनच वर्गणी गोळा करावी, असे आवाहन धर्मादाय उपआयुक्त सौ. प्रणिता श्रीनिवार यांनी केले आहे.

00000

1 comment:

  1. सर,
    दूर्गा माता नवरात्र महोत्सव समितीची नोंदणी करावयाची आहे. पण www.charity.maharashtra.gov.in हे संकेत स्थळ चालत नाही आणि http://mahacharity.gov.in या संकेतस्थळावर लिंक सापडत नाही.
    कृपया मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...