Wednesday, September 21, 2016

महिला लोकशाही दिनी
अर्ज करण्याचे आवाहन 
  नांदेड, दि. 21 :- समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी लोकशाही दिनी आपले अर्ज विहित नमुन्यात प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनी तर तालुक्यात प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तहसिलदार यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी असा मुलभुत हक्क दिलेला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होवून न्याय मिळावा यादृष्टिने महिलांच्या तक्रारी, अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी प्रभावी उपाय योजना म्हणून राज्य महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णयान्वये प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे व जिल्ह्यातील सर्व तालुक्यात प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली महिला लोकशाही दिन साजरा करण्यात येतो.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...