वृत्त क्र. 687
खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या नॉर्मल व सीबीसी योजनेत दंडव्याज माफीची संधी
नांदेड दि. 9 ऑगस्ट :- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या खादी आयोग निधी व कन्सोटियम बँक फायनान्स या दोन्ही योजनासाठी दंडव्याज माफी जाहीर केली आहे. महाराष्ट्र जमीन महसुल संहिता 1966 मधील वसुली तरतुदीअंतर्गत कायदेशिर कार्यवाही करण्यात येऊ नये यासाठी कर्जदार कारागिरांनी फक्त मुद्दल व सरळ व्याज एकरकमी भरणा 30 सप्टेंबर 2024 पर्यत करावा आणि दंडव्याज माफी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत खादी आयोग निधी योजनेअंतर्गत सन 1962 ते सन 1995 पर्यत तसेच सन 1995 ते सन 2001 पर्यत कन्सोर्टीयम फायनान्स अंतर्गत आर्थिक सहाय्य दिले जात होते. या कर्जाची अंशत वसुली झाली आहे. काही कारागिरांचे कर्ज थकित राहील्यामुळे संबंधितावर महसुली वसुली प्रस्ताव (आर.आर.सी) बाबत कार्यवाही करुन महसूल दस्ताऐवजामध्ये शासकीय थकबाकीची नोंद करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ , जिल्हा कार्यालय, उद्योग भवन एमआयडीसी एरिया, शिवाजीनगर नांदेड यांचा दूरध्वनी क्रमांक 02462-240674/9421841809 वर संपर्क साधावा असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment