ऊर्जामंत्री बावनकुळे आज नांदेडात
महावितरणच्या पंधरा उपकेंद्राचे करणार भुमिपूजन
नांदेड दि. 29 :- राज्याचे ऊर्जा , नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज नांदेड दौ-यावर येत आहेत. नांदेड जिल्हयातील महावितरण कंपनीच्या
प्रस्तावीत कामांचे भुमिपूजन ऊर्जामंत्र्यांच्या
हस्ते करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वीजग्राहकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी
जनता दरबाराचे कुसूम सभागृह येथे वीजग्राहकांशी मुक्त संवाद साधणार आहेत.
नांदेड जिल्हयातील महावितरणच्या पंडीत दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती
योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या 33 केव्ही उपकेंद्र अमराबाद (बरसगाव) ता. अर्धापूर, हळदा ता. कंधार, कासारखेडा ता. नांदेड, चांडोळा ता. मुखेड,
जांब ता. मुखेड, लोहगाव ता. बिलोली, ढोलउमरी ता. उमरी, घोगरी ता. हदगाव, मालबोरगाव
ता. किनवट, पोटा ता. हिमायतनगर, येताळा ता. धर्माबाद त्याचबरोबर एकात्मिक ऊर्जा
विकास योजने अंतर्गत तरोडानाका, लोहा, कंधार व बिलोली येथील मंजुर विद्युत
उपकेंद्राचे भुमीपूजन ऊर्जामंत्री श्री. बावनकुळे यांच्या हस्ते कुसूम सभागृह येथे
सामुहिकरित्या सकाळी 9 वा. केले जाणार आहे. भुमिपुजनानंतर लगेच नांदेड जिल्हयातील सर्वपक्षीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी
त्याचबरोबर वीजग्राहक यांच्या उपस्थितीत वीज समस्येबाबत विविध प्रकारच्या तक्रारी, निवेदने व सुचना यांचा स्विकार
करून त्यांचे निराकरण जनता दरबाराच्या माध्यमातून केले जाणार आहे.
सर्वसामान्य वीजग्राहकांसोबतच नांदेड जिल्हयातील खासदार,
आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, महापौर, नगराध्यक्ष, नगरसेवक,
सभापती, पदाधिकारी यांच्यासोबत तसेच महावितरण, महापारेषण कंपनीचे कार्यकारी
अभियंता ते वरिष्ठस्तरावरील अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक ते
वरिष्ठस्तर अधिकारी यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय
विश्रामगृहाच्या सभागृहात दुपारी 2 ते 4 या कालावधीत चर्चा करणार असून त्याच ठिकाणी
दुपारी 4 वा. विविध माध्यमांचे प्रतिनिधी यांच्यासोबत सुसंवाद साधणार आहेत.
No comments:
Post a Comment