Thursday, October 10, 2024

 वृत्त क्र. 924

नांदेड येथील आजचा महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम तूर्तास रद्द

रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखावटा

नांदेड दि १० ऑक्टोबर : ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज (गुरुवार १० रोजी) एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. त्यामुळे आज दिनांक 10 रोजी गुरुवारी होणाऱ्या महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाने पुढे केला आहे. कार्यक्रमाबाबत नवीन तारीख, वेळ, स्थळ लवकरच जाहीर केली जाईल, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले आहे.

श्री.रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील,असे महाराष्ट्र शासनाने जाहीर केले आहे .या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत. त्यामुळे नांदेड येथील मोंढा मैदानावर आज दुपारी होणारा कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे. कार्यक्रम नेमका कधी होईल हे मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन ठरविण्यात येईल व त्याबाबतचे अधिकृत घोषणा नंतर करण्यात येईल असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यातील समस्त जनतेने विशेषता महिला भगिनींनी याची नोंद घ्यावी. जिल्हा प्रशासनाकडून या संदर्भात अधिकृत माहिती दिली जाईल.
000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 954 राजकीय पक्षानी निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशांचे पालन करावे -           जिल्हाधिकारी अभिजीत राऊत • राजकीय पक्षांचे प्...